Saturday, April 29, 2017

बौद्धिक षंढत्व

मी देऊ शकत नाही नवा विचार
ना शक्यता निर्माण करू शकतो क्रांतीची
मी लिहू शकतो फक्त आत्ममग्न स्वगतं
मला जमते फक्त माझे रडगाणे आभाळाएवढे करणे
मी गाठू शकतो केवळ निरर्थकतेचेच तळ
आशावादाचे कर्ज डोक्यावर घेऊन फिरणे
आता परवडत नाही
मी नाही लिहू शकत नवी कविता
कारण जमत नाही आता झटकून देणे
कुजलेल्या सौंदर्यशात्राचे ओझे
मी जाणीव करु शकत नाही समृद्ध
फक्त प्रसवू शकतो भूल
स्थळकाळाचे भान ठेवून
मी आता पत्करलेय बौद्धिक षंढत्व
आणि करत सुटलोय जयजयकार
कशाचही....

No comments: